Ad will apear here
Next
भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद, अभिनेता जिमी शेरगिल, कोंकणा सेन शर्मा
भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद, अभिनेता जिमी शेरगिल, कोंकणा सेन शर्मा यांचा तीन डिसेंबर हा जन्मदिन. त्या निमित्ताने त्यांचा अल्प परिचय...
......
डॉ. राजेंद्र प्रसाद :
स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती भारतरत्न राजेंद्र प्रसाद यांचा तीन डिसेंबर १८८४ हा जन्मदिन. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान देणारे राजेंद्र प्रसाद यांनी १९५० ते १९६२ या कालावधीत राष्ट्रपतिपदाची जबाबदारी सांभाळली. सलग दोन कार्यकाळ ही जबाबदारी पार पडणारे ते एकमेव राष्ट्रपती आहेत.

सध्याचा बिहार आणि तत्कालीन बंगाल प्रांतातील झिरादेई गावात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील संस्कृत आणि पर्शियन भाषेचे तज्ज्ञ होते. राजेंद्र प्रसाद यांनी कोलकाता विद्यापीठातून अर्थशास्त्रात एमएचे शिक्षण घेतले. त्यानंतर वकिलीचे शिक्षण घेतले आणि १९३७मध्ये अलाहाबाद विद्यापीठाची डॉक्टरेट मिळवली. बिहार आणि ओडिशा येथील उच्च न्यायालयात त्यांनी काही काळ काम केले. राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभागी होऊन त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान दिले. १९३१ आणि १९४२ च्या चळवळीत त्यांना तुरुंगवास झाला. 

देशात शिक्षणाच्या चांगल्या सुविधा निर्माण व्हाव्यात म्हणून त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला. २८ फेब्रुवारी १९६३ रोजी पाटणा येथे त्यांचे निधन झाले. 
.........
जिमी शेरगिल :
हिंदी चित्रपटसृष्टीतील गुणी अभिनेता अशी ओळख असणाऱ्या जिमी शेरगिल याचा तीन डिसेंबर १९७० हा जन्मदिन. जसजित सिंग असे त्याचे मूळ नाव असून, तो जिमी शेरगिल म्हणून सर्वपरिचित आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे एका पंजाबी कुटुंबात झाला. पटियालातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर चित्रपटसृष्टीत नशीब आजमावण्यासाठी तो मुंबईत आला. 

१९९६मध्ये माचिस चित्रपटातून त्याने हिंदी चित्रपटात पदार्पण केले. हा चित्रपट चांगला चालला. त्यानंतर ‘मोहब्बतें’ या चित्रपटात अमिताभ बच्चन, शाहरुख खान यांच्याबरोबर त्याला संधी मिळाली. मेरे यार की शादी है, दिल है तुम्हारा, हासील, मुन्नाभाई एमबीबीएस, यहां, लगे रहो मुन्नाभाई, एकलव्य, बुलेट राजा, फगली अशा अनेक चित्रपटांमधील त्याच्या कामाची तारीफ झाली. २००५मध्ये ‘यारा नाल बहारे’ या पंजाबी चित्रपटातून त्याने पंजाबी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. आज पंजाबी चित्रपटसृष्टीतील तो एक आघाडीचा कलाकार आहे. 

चित्रपट निर्माता म्हणूनही तो काम करत आहे. २००१मध्ये त्याने त्याची मैत्रीण प्रियांका पुरी हिच्याशी विवाह केला. त्यांना वीर नावाचा एक मुलगा आहे.   
......

कोंकणा सेन शर्मा :
कसदार अभिनय आणि वेगळ्या वाटेवरचे चित्रपट करणारी प्रयोगशील अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा हिचा तीन डिसेंबर १९७९ हा जन्मदिन. दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवणारी ही अभिनेत्री आणि निर्माती अपर्णा सेन यांची कन्या आहे. १९८३ मध्ये इंदिरा या चित्रपटात बालकलाकार म्हणून तिने अभिनयाची सुरुवात केली. 

२०००मध्ये बंगाली चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीचा प्रारंभ केला. २००२मध्ये आलेल्या मिस्टर अँड मिसेस अय्यर या चित्रपटासाठी तिला उत्कृष्ट अभिनेत्रीचे राष्ट्रीय पारितोषिक मिळाले. ओमकारा आणि लाइफ इन मेट्रो या चित्रपटातील तिच्या भूमिकांसाठी तिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. २०१७मध्ये तिने दिग्दर्शनात पदार्पण करत ‘ए डेथ इन दी गुंज’ हा चित्रपट तयार केला.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZYRCH
Similar Posts
दि. बा. मोकाशी, गणेश मावळणकर, बप्पी लाहिरी ज्येष्ठ लेखक दि. बा. मोकाशी, पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष गणेश मावळणकर आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांचा २७ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त त्यांचा हा अल्प परिचय
शत्रुघ्न सिन्हा, सोनिया गांधी, होमाई व्यारावाला प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा, काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि भारताच्या पहिल्या महिला वृत्तछायाचित्रकार होमाई व्यारावाला यांचा नऊ डिसेंबर हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
आशा काळे, अमृता खानविलकर, रझा मुराद, गीता दत्त मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे, उत्तम नर्तिका आणि अभिनेत्री अमृता खानविलकर, अभिनेते रझा मुराद, गायिका गीता दत्त यांचा २३ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्ताने त्यांचा हा अल्प परिचय.
मा. कृ. पारधी : शंभरीत पदार्पण केलेले व्यासंगी व्यक्तिमत्त्व केंद्र सरकारच्या माहिती खात्यात विविध पदे भूषवून निवृत्त झालेले माधव कृष्ण पारधी १८ डिसेंबर २०१९ रोजी वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहेत. ते नाट्यसमीक्षक, लेखक आणि कवीही आहेत. पु. ल. देशपांडे यांच्याशी त्यांचा स्नेह होता. अनेक महत्त्वाच्या साहित्यिक-सांस्कृतिक घटना-घडामोडींचे साक्षीदार असलेल्या पारधी यांचा हा अल्प परिचय

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language